पूज्य साध्वी ऋतुंभरा यांच्या श्रीमद़्भागवत कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद !
नवी मुंबई – पूज्य साध्वी ऋतुंभरा यांच्या खारघर येथे आयोजित ‘श्रीमद़्भागवत’ कथेला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. खारघर येथील ‘श्रीमती राजकुमारी आणि जगदीश प्रसाद कसेरा वेल्फेअर ट्रस्ट’च्या वतीने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिदिन सहस्रो भाविक ही कथा ऐकून मंत्रमुग्ध होत आहेत.
१. १४ डिसेंबरपासून चालू झालेल्या या कथेच्या प्रारंभी ‘कलश यात्रा’ काढण्यात आली होती. त्यानंतर प्रतिदिन दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत पूज्य साध्वी ऋतुंभरा या श्रीमद़्भागवत कथा सांगतात.
२. पहिल्या दिवशी श्रीमद़्भागवत कथा माहात्म्य, त्यानंतर श्री शुकदेव प्रसंग, श्री नारद चरित्र, भीष्म कुंती स्तुती, सती प्रसंग, ध्रुव प्रसंग, श्री प्रल्हाद कथा, श्री कृष्णजन्म महोत्सव, श्रीकृष्ण चाललीला या विषयावर कथा झाली आहे.
३. १८ डिसेंबरला गोवर्धन पूजा आणि छप्पन भोग, १९ डिसेंबरला कृष्ण-रुक्मिणी विवाह, २० डिसेंबरला सुदामा चरित्र, व्यास पूजा याविषयीची कथा होणार आहे. सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.