जीवनाचा उद्देश
जीवनाचा उद्देश संतत्वाची प्राप्ती करून घेणे वा संतांनी दाखवलेल्या दिशेने आयुष्याची वाटचाल करणे, हा असावा. नाविकाची दृष्टी उत्तर ध्रुवावर नसली, तर त्याचा मार्ग भरकटतो. जीवनाचे ध्येय उच्च-उदात्त असेल, तरच जीवन सन्मार्गी राहील. नाही तर मनुष्य कुठेतरी भरकटत जाईल. त्यामुळे सर्व समाज अस्वास्थ्याच्या गर्तेत ढकलला जाईल.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)