धरणगाव येथे ‘अखंड नामजप यज्ञ’ सप्‍ताह उत्‍साहात !

मार्गदर्शनला उपस्थित भाविक

धरणगाव (जिल्‍हा जळगाव) – येथील श्री स्‍वामी समर्थ सेवा केंद्र येथे ९ ते १६ डिसेंबर या कालावधीत दत्तजयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरे गुरुचरित्र पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. या सप्‍ताहकाळात आध्‍यात्मिक आणि समाजप्रबोधन यांसारख्‍या विविध विषयांवर तज्ञांनी मार्गदर्शन केले. मान्‍यवरांसह १० सहस्रांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

३०४ सेवेकर्‍यांनी श्री गुरुचरित्र पारायणात सहभाग घेतला. या कालावधीत गणेश याग, गीताई याग, स्‍वामी याग, चंडीयाग, मल्‍हारी आणि रुद्र याग झाले. या कालावधीत दिवसरात्र अखंड वीणा वादन, स्‍वामी चरित्र वाचन, स्‍वामी समर्थ माळजप प्रहरे करण्‍यात आले. ४ दिवसांचे युवा प्रबोधन आणि व्‍यवसायाविषयी मार्गदर्शन शिबिर पार पडले. याचा सहस्रो युवकांनी लाभ घेतला.

२२ डिसेंबर या दिवशी केंद्रात बालसंस्‍कार विभागाच्‍या वतीने एक दिवसाच्‍या शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे.