देवा, तुझ्या हिशोबाचे गणित ।
ईश्वराचे नियोजन सर्वोत्कृष्ट असते. त्याच्या नियोजनात कुठलीही त्रुटी कधीही रहात नाही; परंतु भगवंताच्या नियोजनाचा कार्यकारणभाव लक्षात न आल्याने माझ्यासारख्या अज्ञानी जिवांच्या मनात शंका निर्माण होतात. या दृष्टीने विचार करत असतांना गुरुदेवांनी सुचवलेल्या ओळी,
देवा,
तुझ्या हिशोबाचे गणित ।
आम्हाला नाही कळत ।
म्हणूनच प्रश्न असतात पडत ॥ १ ॥
संघर्ष करत धडपडत ।
नाही परिस्थिती स्वीकारत ।
असे का झाले ? व्हायला नको होते ।
असे अनावश्यक रहाते म्हणत ॥ २ ॥
– सौ. स्वाती शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), रामनाथी, गोवा (१५.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |