Ex-Pakistan Minister Lauds Priyanka : पाकिस्तानच्या माजी मंत्र्याने कौतुक करत पाकच्या खासदारांमध्ये असे धाडस नसल्यावरून केली टीका !

प्रियांका वाड्रा यांनी संसद परिसरात ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली पिशवी आणल्याचे प्रकरण

पाकीस्तानचे माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी आणि प्रियांका वाड्रा

नवी देहली : काँग्रेसच्या खासदार प्रियांका वाड्रा यांनी १६ डिसेंबरला संसद परिसरात ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली पिशवी घेऊन आल्या होत्या. यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर पाकीस्तानचे माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी प्रियांका वाड्रा यांचे कौतुक केले आहे.

ते म्हणाले, ‘‘नेहरूंसारख्या उत्तुंग स्वातंत्र्यसैनिकाच्या पणतीकडून आपण आणखी काय अपेक्षा करू शकतो ? प्रियांका ताठ मानेने उभ्या राहिल्या आहेत. आजपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी संसदेच्या सदस्याने असे धाडस दाखवले नाही, याची लाज वाटते.’’

प्रियांका वाड्रा यांनी बांगलादेश लिहिलेली आणली पिशवी

टीका होऊ लागल्यावर बांगलादेशी पिशवी घेऊन आंदोलन करणाऱ्या प्रियांका वाड्रा !

प्रियांका वाड्रा यांनी संसद परिसरात पॅलेस्टाईन लिहिलेली पिशवी आणल्यावरून झालेल्या टीकेनंतर १७ डिसेंबरला संसद परिसरात ‘बांगलादेश : हिंदु आणि ख्रिस्ती यांच्यामागे उभे रहा’ लिहिलेली पिशवी आणली. याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. (केवळ असे लिहून उपयोग नाही, तर प्रियांका वाड्रा यांनी तेथील हिंदूंच्या संरक्षणासाठी कृतीशील प्रयत्नही करणेही आवश्यक आहे ! – संपादक)

प्रियांका वाड्रा ‘पॅलेस्टाईन’ची पिशवी घेऊन फिरतात, तर आमच्या तरुणांना इस्रायलमध्ये प्रतिमहा दीड लाख रुपये वेतन मिळत आहे ! – योगी आदित्यनाथ यांची टीका

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रियांका वाड्रा यांच्यावर केली टीका

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही प्रियांका वाड्रा यांच्यावर टीका केली. त्यांनी विधानसभेत बोलतांना प्रियांका यांचे नाव न घेता म्हटले की, विरोधी खासदार पॅलेस्टिनी पिशवी घेऊन फिरत होते. उत्तरप्रदेशातील तरुणांना इस्रायलमध्ये नोकर्‍या मिळत आहेत. उत्तरप्रदेशाचे ५ हजारांहून अधिक तरुण इस्रायलला गेले असून त्यांना महिन्याला दीड लाख रुपये वेतन मिळत आहे.

संपादकीय भूमिका

इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये हमासचे आतंकवादी आणि त्यांना साहाय्य करणारे यांना ठार करत आहे. याचा त्रास होणारे इस्लामी देश अफगाणिस्तान, इराक, इराण, सीरिया या देशांमध्ये मुसलमानच मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार करतांना, मशिदीमध्ये बाँबस्फोट घडवत असतांना त्याचा विरोध का करत नाहीत ?