सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांशी स्थूल रूपातून एकरूप होत असल्याविषयी येत असलेल्या अनुभूती
१. ‘संत आणि साधक यांचे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या स्थूल रूपाशी साधर्म्य आहे’, असे हिंदुत्वनिष्ठ अन् साधक यांना वाटणे
अ. ‘या वर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव २०२४’ मध्ये आलेल्या एका हिंदुत्वनिष्ठाने जळगावच्या साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांना विचारले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांच्या कन्या आहेत का ? त्यांचा चेहरा आणि गुरुदेवांचा चेहरा एकसारखाच दिसतो.’’
आ. हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी सांगितले, ‘‘जेव्हा जेव्हा मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना पहातो, तेव्हा मला असे वाटते की, त्या साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवलेच आहेत. अशी अनुभूती मला ३ – ४ वेळा आली आहे.’’
इ. आसामहून आलेले हिंदुत्वनिष्ठ श्री. वीरेंद्र पांडये यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांना पाहिल्यानंतर मला विचारले, ‘‘गुरुदेव तुमचे पिता आहेत का ?’’
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांना गुरु- शिष्य यांच्या स्थुलातील एकरूपतेविषयी सांगितल्यावर त्यांनी ‘आपण सर्वजण ईश्वराशी एकरूप होत आहोत’, असे सांगणे
या सर्व अनुभूती आणि समाजाच्या प्रतिक्रिया यांवरून असे शिकायला मिळाले की, ‘अध्यात्मातील एक तत्त्व आहे की, गुरु आणि शिष्य साधनेमुळे अंतरंगात एकरूप होत जातात’; परंतु वरील सूत्रांवरून असे लक्षात आले, ‘गुरु आणि शिष्य स्थूल रूपातही एकरूप होत आहेत.’ याविषयी माझे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्याशी बोलणे झाले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण सर्वजण ईश्वराशी एकरूप होत आहोत.’’
– श्री. शंभू गवारे, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४७ वर्षे), धनबाद, झारखंड. (२६.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |