कु. प्रल्हाद गाडी (वय ८ वर्षे) याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामधील चैतन्याची आलेली प्रचीती !
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाची ध्वनीचित्रफीत पहातांना प्रल्हादला ‘गरुड सनातनचे तिन्ही मोक्षगुरु आसनस्थ असलेला दिव्य रथ घेऊन पुढे जात आहे’, असे सूक्ष्मातून दिसणे
‘९.६.२०२४ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाची ध्वनीचित्रफीत साधकांना दाखवली. सनातनचे तिन्ही मोक्षगुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) आसनस्थ असलेला रथ मैदानात येत होता. तेव्हा गरुडाचे चित्र दाखवले. त्या वेळी माझ्या मुलाला (प्रल्हादला, वय ८ वर्षे) सूक्ष्मातून दिसले, ‘गरुड तो दिव्य रथ घेऊन पुढे जात आहे.’ तेव्हा त्याला पुष्कळ आनंद झाला.
२. ब्रह्मोत्सव सोहळ्याची ध्वनीचित्रफीत पहात असतांना प्रल्हादला तापाची जाणीव न होणे
खरेतर त्या दिवशी त्याला पुष्कळ ताप होता. ब्रह्मोत्सव सोहळ्याची ध्वनीचित्रफीत पहात असतांनाही त्याच्या अंगात ताप होता. मी त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते. तो सोहळा पाहून झाल्यावर प्रल्हाद मला म्हणाला, ‘‘कार्यक्रम पहातांना मला तापाची मुळीच जाणीव नव्हती. तापाचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. केवढ्या मोठ्या प्रमाणात चैतन्य कार्यरत झाले असणार !’’
३. प्रल्हादला पुष्कळ ताप असूनही तो अस्वस्थ झाला नाही. तो कार्यक्रम संपेपर्यंत जागा होता. त्याने संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पाहिला.
‘हे केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमधील चैतन्यामुळेेच झाले’, असे मला वाटतेे.’
– सोै. आराधना चेतन गाडी (कु. प्रल्हादची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.८.२०२४)
|