Fateh Bahadur Singh : (म्हणे) ‘मंदिराकडे जाण्याचा मार्ग अंधश्रद्धा, ढोंगीपणा आणि मूर्खपणा यांकडे घेऊन जातो !’ – आमदार फतेह बहादूर सिंह, राष्ट्रीय जनता दल पक्ष
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे आमदार फतेह बहादूर सिंह यांचे संतापजनक विधान
रोहतास (बिहार) – समाजात २ मार्ग आहेत ते म्हणजे मंदिर आणि शाळा. मंदिरे अंधश्रद्धा, दांभिकता आणि मूर्खपणा यांकडे नेत असतात. शाळा तर्कशुद्ध ज्ञान, वैज्ञानिक विचार आणि जीवनात सकारात्मक पालट घडवून आणतात. तुमच्या मुलांना मंदिरात नाही, तर शाळेत पाठवा, असे फुकाचे आवाहन डेअरी मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दल पक्षाचे आमदार फतेह बहादूर सिंह यांनी देवरिया गावातील एका सत्कार समारंभात केले. ‘हे मी म्हणत नाही, हे सावित्रीबाई फुले सांगतात आणि त्यांचे म्हणणे मी लोकांसमोर ठेवत आहे’, असेही त्यांनी सांगितले.
🚨 Fateh Bahadur Singh, an MLA from Lalu Prasad Yadav’s Rashtriya Janata Dal party, has made a shocking statement: “The path to temples leads to blind faith, hypocrisy, and foolishness!” – Sparks Outrage!
He further claimed that “Brahminism has caused division in society!” 🤯… pic.twitter.com/2QUdP9S8Ba
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 18, 2024
(म्हणे) ‘ब्राह्मणवादाने समाजाची विभागणी केली !’
आमदार सिंह पुढे म्हणाले की, ब्राह्मणवादाने समाजाला क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी विभागणी केली आहे. सर्व मानव समान आहेत. प्रत्येक व्यक्तीने मानवतेला प्राधान्य दिले पाहिजे. (मानवतेला प्राधान्य द्यायचे, तर ब्राह्मणद्वेष का दाखवला जातो ? ब्राह्मणांचा विरोध का केला जातो ? याचे उत्तर सिंह देतील का ? ब्राह्मण मानव नाहीत, असे त्यांना वाटते का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|