Temples Discovered In Uttar Pradesh : संभल (उत्तरप्रदेश) येथे आणखी एक बंद असणारे मंदिर सापडले !

संभल (उत्तरप्रदेश) – येथे ३ दिवसांपूर्वी मुसलमानबहुल खग्गू सराय भागात ४६ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर सापल्यानंतर संभलमधील मुसलमानबहुल सराई तारीन भागात राधा-कृष्ण मंदिर सापडले आहे. हे मंदिरही फार जुने असल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी हे मंदिर उघडले आहे. या मंदिरात श्री हनुमानाची आणि राधा-कृष्ण यांच्या ३ फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिरात स्वच्छता केली जात आहे. स्वच्छता करणार्‍यांनी सांगितले की, आज मंगळवार म्हणजे बजरंगबलीचा दिवस असून मंदिरात स्वच्छतेनंतर पूजा केली जाणार आहे. येथील ऋषीपाल यांनी सांगितले की, पूर्वी येथे २०० हून अधिक हिंदु कुटुंबे रहात होती; मात्र वर्ष १९७८ च्या दंगालीनंतर ती दुसरीकडे स्थलांतरित झाले.

(म्हणे) ‘हिंदू सोडून गेल्याने मंदिर बंद होते !’ – काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद

खासदार इम्रान मसूद

काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणाले की, तुम्ही द्वेषासाठी ‘जय श्रीराम’च्या घोषणा का देता ? (द्वेषापोटी ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे), नारा-ए-तकबीर, (अल्ला सर्वांत मोठा आहे) अशा प्रकारच्या घोषणा देणार्‍यांच्या विरोधात इम्रान मसूद कधी तोंड उघडतांना का दिसत नाहीत ? केवळ हिंदूंना अशा प्रकारचे डोस पाजण्याचा प्रयत्न हिंदू आता सहन करणार नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे ! – संपादक) प्रेम म्हणजे जय श्रीराम. हा रामाचा देश आहे. (अशा रामाचे मंदिर बाबराने पाडून तेथे मशीद बांधली, याचा इम्रान मसूद यांनी किती वेळा विरोध केला आणि तेथे श्रीराममंदिर पुन्हा बांधण्यासाठी त्यांनी किती वेळा मागणी केली ? देशातील इतर मंदिरांच्या ठिकाणाविषयी जेथे मशिदी बांधल्या आहेत, त्याविषयी ते का बोलत नाहीत ? – संपादक) मंदिर कुठे गेले ? मंदिर तिथेच होते. लोक तिथून निघून गेल्यावर मंदिर बंद होते. (या मंदिराच्या ठिकाणी मुसलमानांनी अतिक्रमण का केले ? येथील हिंदूंना तेथून पलायन का करावे लागले ? या प्रश्‍नांची उत्तरे इम्रान मसूद देतील का ? – संपादक)

मंदिराच्या ठिकाणचे अतिक्रमण पाडण्याचे काम चालू

संभलच्या खग्गु सराय भागात सापडलेल्या शिवमंदिराला लागून करण्यात आलेले अतिक्रमण घराचे मालक मतीन यांनी स्वतःहून पाडण्यास चालू केले आहे. या मंदिरात सध्या पूजा आणि आरती होऊ लागली असून मोठ्या संख्येने हिंदू येथे दर्शनासाठी येऊ लागले आहेत.

संभलमध्ये वीजचोरी करणार्‍या ४ मशिदी आणि १ मदरसा यांवर कारवाई

देशातील प्रत्येक मशीद आणि मदरसा यांच्याकडे कोणत्या पद्धतीने वीज वापरली जात आहे, याची आता चौकशी करण्याची मोहीम उघडली पाहिजे ! इस्लाममध्ये चोरी हराम (अयोग्य) असतांना मशिदी आणि मदरसे यांतच चोरीची वीज वापरली जात असेल, तर त्याच्या विरोधात इस्लामी धर्मगुरूंनी बोलले पाहिजे !

गेल्या २ दिवसांत संभलमध्ये ९० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांपैकी ४ मशिदी आणि १ मदरसा येथे वीजचोरी केली जात होती. चोरीच्या विजेचा येथे वापर केला जात होता. येथे २ दिवसात अंदाजे १ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या ३ महिन्यांत संभल जिल्ह्यात वीजचोरीच्या प्रकरणी पोलिसांनी १ सहस्र २५० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, तर ५ कोटी २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (दंड ठोठावून थांबू नये, तर त्यांतील प्रत्येक रुपये वसूल केला पाहिजे. जर दंड भरत नसतील, त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने आता मंदिर सापडल्यानंतर या भागात पुन्हा हिंदूंना वसवण्याचा आणि संरक्षण पुरवण्याचाही प्रयत्न केला पाहिजे !