Ghaziabad Proposed DharmSansad : यति नरसिंहानंद यांच्या धर्मसंसदेविषयी माजी प्रशासकीय अधिकार्‍यांना पोटशूळ !

सर्वोच्च न्यायालयात धाव !

यति नरसिंहानंद आणि अन्य यांच्या वतीने आयोजित धर्मसंसदेला माजी प्रशासकीय अधिकारी आणि कथित सामाजिक कार्यकर्ते यांचा विरोध !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) : या आठवड्यात यति नरसिंहानंद आणि अन्य यांच्या वतीने धर्मसंसद आयोजित करण्यात आली आहे. ही धर्मसंसद रहित करण्यात यावी, यासाठी माजी प्रशासकीय अधिकारी आणि कथित सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या धर्मसंसदेवर कारवाई करण्यात उत्तरप्रदेश पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यति नरसिंहानंद यांच्यावर मुसलमानांच्या विरोधात वारंवार कथित द्वेषपूर्ण भाषणे दिल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. (धर्मांधांचे खरे स्वरूप कुणी उघड केल्यावर संबंधितांवर तुटून पडणारी निधर्मीवाद्यांची टोळी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी नेहमीच मूग गिळून गप्प बसतात, हे लक्षात घ्या ! – संपादक) याचिकाकर्त्यांमध्ये अरुणा रॉय, अशोक कुमार शर्मा, देब मुखर्जी, नवरेखा शर्मा, सय्यदा हमीद, विजयन् एम्.जे. यांसारख्या निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.