गड-दुर्गांवर मद्यपान केल्यास १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांचा कारावास !

नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – गड-दुर्ग यांसह प्राचीन स्मारके यांवर मद्यपान केल्यास यापूर्वी १० सहस्र रुपये दंड आणि १ वर्ष कारवास अशी शिक्षा होती; मात्र त्यात शासनाने वाढ केली आहे. १६ डिसेंबर या दिवशी हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याविषयीचे ‘महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके आणि पुराणवास्तूशास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष (सुधारणा)’ विधेयक सादर केले. त्यानुसार गड-दुर्ग येथे मद्यपान केल्यास १ लाख रुपये दंड आणि २ वर्षांचा कारावास अशी शिक्षा होईल. विधीमंडळात हे सुधारणा विधेयक पटलावर ठेवण्यात आले