नूतन मंत्रीमंडळातील २३ मंत्र्यांवर विविध गुन्हे नोंद !
नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – राज्याच्या मंत्रीमंडळाचा महाविस्तार १५ डिसेंबर या दिवशी येथील राजभवन येथे पार पडला. ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नूतन मंत्रीमंडळातील २३ मंत्र्यांवर विविध गुन्हे नोंद आहेत. ९ मंत्री इयत्ता १२ वीपर्यंत शिकलेले आहेत, तर उर्वरित २ जण इयत्ता १० वी उत्तीर्ण आहेत. ५ मंत्री हे पदव्युत्तर पदवी मिळवलेले आहेत, तर ४ जणांनी पदविका पूर्ण केली असून १८ जण पदवीधर आहेत.
सर्वांत श्रीमंत मंत्री मंगलप्रभात लोढा !
भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे सर्वांत श्रीमंत मंत्री असून त्यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी ९ लाख २३ सहस्र रुपये इतकी आहे. त्यानंतर शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा क्रमांक असून त्यांची संपत्ती ३३३ कोटी ३२ लाख ९५ सहस्र रुपये इतकी आहे. तिसर्या क्रमांकावर भाजपचे शिवेंद्रराजे भोसले असून त्यांची संपत्ती १२८ कोटी ४१ लाख ८१ सहस्र रुपये इतकी आहे, तर शिवसेनेचे दादा भुसे यांची संपत्ती १ कोटी ६० लाख ८५ सहस्र रुपये इतकी आहे.