रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय 

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१. श्री. राजकुमार गुजर (विश्वस्त, पंचमुखी हनुमान मंदिर), सोलापूर, महाराष्ट्र.

अ. ‘आश्रम पाहून मला वाटले, ‘हे देवांचा वास असलेले मंदिर आहे.’

२. अधिवक्ता सुधांशु मोरजकर, गोवा

अ. ‘मला आश्रमात पुष्कळ प्रसन्न वाटले आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला.

आ. आश्रमात फार चांगली व्यवस्था आणि अनुशासन आहे.’

३. अधिवक्ता संजय शिंदे, क्षेत्रमाऊली, जि. सातारा  

अ. ‘हिंदु धर्माच्या उत्थापनासाठी आश्रमाचे योगदान पुष्कळ आहे.

आ. आश्रमात खरेच दैवी शक्तींचा वास आहे.’

४. अधिवक्ता जगन्नाथ गुल्हाने, अकोला, महाराष्ट्र. 

अ. ‘आश्रमात आल्यानंतर मला वाटले, ‘मी एखाद्या मंदिरात आलो आहे.’

आ. ‘भारतात हिंदु राष्ट्र’ स्थापन होईलच’, अशी निश्चिती झाली.’

५. अधिवक्ता गिरीश गिरकर, मालवण, जि. सिंधुदुर्ग.   

अ. ‘आश्रम पाहिल्यानंतर मला वेगळी अनुभूती आली.

आ. आश्रमातील वेगवेगळे उपक्रम पहाता सखोल संशोधन आणि शोध यांची अचंबित करणारी माहिती मला मिळाली.

इ. येथे आल्यावर ‘स्वतःच्या आचरणात कसे पालट करावेत ? आणि साधना कशी वाढेल ?’, यांकडे लक्ष द्यायला हवे’, हे माझ्या लक्षात आले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.६.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार मान्यवरांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक