हे सरकार ‘इ.व्ही.एम्.’च्या भरवशावर आलेले सरकार ! – विजय वडेट्टीवार, काँग्रेस
विधान भवनात विरोधी पक्षांचे ‘इ.व्ही.एम्.’च्या विरोधात आंदोलन !
नागपूर – राज्यातील महायुती सरकार हे ‘इ.व्ही.एम्.’च्या भरवशावर सत्तेत आले आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ‘इ.व्ही.एम्.’च्या विरोधात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन चालू केले आहे. त्या वेळी ते बोलत होते.
महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘इ.व्ही.एम्.’ यंत्राची प्रतिकृती घेऊन ‘लोकशाही वाचवा’, ‘इ.व्ही.एम्. हटवा, देश वाचवा’, अशा घोषणा दिल्या. मर्कडवाडी येथे ग्रामस्थांनी इ.व्ही.एम्.ला विरोध करून बॅलेटवर (पेपरवर) निवडणूक घेण्याची मागणी केली; मात्र त्यांना विरोध करण्यात आला. या प्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, ‘‘येणार्या काळात बॅलेटवर निवडणूक घेतली पाहिजे, या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे.’’