श्रीसिद्धिविनायक मंदिरातील विश्वस्तांच्या संख्येत वाढ, कार्यकाळही वाढवला !

नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) –  मुंबईतील प्रभादेवी येथील स्वयंभू आणि प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांची संख्या ९ वरून १५ इतकी करण्याचा, तसेच विश्वस्त समितीचा कालावधी ३ ऐवजी ५ वर्षे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. याविषयीचे ‘श्री श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर मंदिर विश्वस्तव्यवस्था (प्रभादेवी) अधिनियम, १९८०’ हे सुधारणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत सादर केले. विधानसभेत बहुमताने हे सुधारणा विधेयक संमत झाले.