एकगठ्ठा व्होट बँकेचा ‘व्होट (मतदान) जिहाद’!
१. ‘व्होट जिहाद’मुळे धुळे लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वनिष्ठ उमेदवाराचा पराभव
‘वर्ष २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला धुळे मतदार संघात सर्वत्र आघाडी मिळाली होती. ते प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या २ लाखांनी पुढे होते; मात्र केवळ मालेगावमधील स्थानिक मतदानाच्या पेट्या मतमोजणीसाठी आल्या आणि महायुतीच्या उमेदवाराचा जवळपास ४ सहस्र मतांनी पराभव झाला. मालेगाव विधानसभेलाही त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यानंतर ‘धर्मांध ‘व्होट जिहाद’ करतात’, असा स्पष्ट आरोप एका नेत्याने केला आणि खळबळ उडाली. त्यानंतर ‘व्होट जिहाद’च्या दृष्टीने अन्वेषण यंत्रणांनी सूत्र हलवली आणि एक मोठे षड्यंत्र बाहेर आले.
२. मालेगावच्या ‘व्होट जिहाद’ला प्रसारमाध्यमांमधून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी
मालेगावच्या ‘व्होट जिहाद’विषयीच्या बातम्या वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांनी मोठ्या प्रमाणावर दिल्या. त्याला ‘सुदर्शन न्यूज’, ‘एबीपी माझा’, ‘रिपब्लिक भारत’, ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिन्यांमध्ये ठळक प्रसिद्धी मिळाली. यासमवेतच ‘द हिंदू’, ‘सत्य हिंदू’ आदी सर्व मोठ्या दैनिकांतही याविषयीच्या बातम्या झळकल्या.
३. ‘व्होट जिहाद’साठी परराज्यातून १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक रुपयांचा पुरवठा
‘व्होट जिहाद’ खरोखरच आहे का ?, याविषयी अन्वेषण यंत्रणांनी अन्वेषण केले. त्यांनी सांगितले की, याकामासाठी निवडणुकीच्या कालावधीत विशेषतः २३.९.२०२४ ते ३.१०.२०२४ या कालावधीत महाराष्ट्र्र, उत्तरप्रदेश, गुजरात आणि बंगाल या राज्यांमधून अनुमाने १ सहस्र कोटी रुपये पाठवण्यात आले. धर्मांधांनी ‘नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक’ आणि ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या बँकांमध्ये अनेक बनावट (खोटी) बँक खाती उघडल्याचे समजते. हिंदूंच्या नावावर नोकरी देण्याचे प्रलोभन देऊन खाते उघडले आणि त्यातून मोठी उलाढाल झाली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी फौजदारी गुन्हा नोंदवला. नवीन फौजदारी कायद्यानुसार अन्वेषण चालू आहे. काही व्यक्तींना अटकही करण्यात आली आहे.
४. अंमलबजावणी संचालनालयाच्या विविध ठिकाणी धाडी
या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) नाशिक, सुरत, कर्णावती, मालेगाव आणि मुंबई येथे घातलेल्या धाडींमध्ये १३ कोटीहून अधिक रक्कम कह्यात घेतली. यात सिराज अहमद हारून मेमन हा स्थानिक व्यापारी मुख्य सूत्रधार असल्याची समजते. प्रारंभी काही दिवस तो पसार होता. पोलिसांनी आतापर्यंत नागणी अक्रम महंमद शफी आणि वसीम भेसांनी यांना अटक केलेली आहे. या गुन्ह्यात हवालामार्फत व्यवहार करण्यात आले, म्हणजेच ‘मनी लॉड्रींग’ घडले.
५. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने ‘व्होट जिहाद’ खणून काढणे आवश्यक !
धर्मांध हे अवैध धंदे करणे, देशविघातक कृत्यात भाग घेणे, देशाचे तुकडे पाडण्याच्या दृष्टीने वर्तन करणे, डेमोग्राफिक (लोकसांख्यिकीय) पालट करणे, अशा अनेक कृती करतात. एवढे करूनही ते समाधानी नाहीत, असे दिसते. आता त्यांचा हा ‘व्होट स्कॅम (घोटाळा) जिहाद’ प्रकार नव्याने उघडकीस आला आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर असून यात स्थानिक धर्मांध, संस्था, व्यक्ती आणि संघटना यांचा किती सहभाग आहे ?, याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण करावे, असे हिंदु मतदारांना वाटते.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (११.१२.२०२४)