चित्तात सूक्ष्मरूपे वास करते ‘चित्शक्ति’ माता ।
घोर कलियुगात हिंदु राष्ट्र अवतरण्या गुरुदेवांनी (टीप १) संकल्प केला ।
या संकल्प पूर्ततेसाठी भू-देवीने ‘चित्शक्ति’रूपे (टीप २) अवतार धारण केला ।। १ ।।
सप्तर्षींच्या आज्ञेने देवतांच्या आशीर्वादास्तव तू पृथ्वी पादाक्रांत केली ।
हिंदु राष्ट्राच्या निर्मितीची पताका सूक्ष्मरूपी अडथळ्यांवर मात करून पुढे नेली ।। २ ।।
हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यासाठी तू दक्षिणेत वास करिशी ।
दूर असूनही साधक जनांच्या चित्ते वसून तू सूक्ष्मरूपे ठाव घेशी ।। ३ ।।
चित्शक्ति मातेचा स्थुलातील सहवास सर्वांना हवासा वाटतो ।
म्हणूनच दूर असूनही मातेचा सहवास सर्वांना समीप भावतो ।। ४ ।।
तूच वाराही (टीप ३), तूच श्रीशैली, तूच सरस्वती या विश्वाची तू जननी ।
रज-तम वृत्तींचा सूक्ष्मरूपे बीमोड करण्या अवतरली तू या अवनी ।। ५ ।।
आम्हा पामर साधकरूपी मुलांवर आई तुझा सदैव आशीर्वाद असावा ।
चित्ताला स्थिर करून आमचा हा जीव श्री गुरुचरणी सत्वर अर्पण करावा ।। ६ ।।
केवळ हीच प्रार्थना वाढदिवसाच्या या शुभदिनी तव चरणा ।
तव चरणा….।।
टीप १ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
टीप २ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
टीप ३ – श्रीविष्णूच्या वराह अवतारात भू-देवीने पत्नी रूपात अवतार धारण केलेले रूप
।। श्रीविष्णुर्पणमस्तु ।।
– श्री. अविनाश जाधव (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१२.२०२४)
|