Pro-Palestine Congress : प्रियांका वाड्रा ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली पिशवी घेऊन पोचल्या संसदेत !
नवी देहली : काँग्रेसच्या खासदार प्रियांका वाड्रा ‘पॅलेस्टाईन’ लिहिलेली पिशवी घेऊन संसदेत पोचल्या. त्याचे एक छायाचित्र समोर आले आहे. प्रियांका वाड्रा यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. नुकतीच त्यांनी पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अबेद एलराजेग अबू जाझर यांची भेट घेतली होती. वायनाड लोकसभा निवडणुकीत प्रियांका वाड्रा यांच्या विजयाबद्दल पॅलेस्टाईनच्या राजदूताने त्यांचे अभिनंदन केले होते. राजदूत अबू जाझर यांच्या समवेतच्या भेटीत प्रियांका वाड्रा यांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला होता. त्या म्हणाल्या होत्या की, त्या लहानपणापासून पॅलेस्टिनी हितासाठी जगत आहेत आणि त्यांचा न्यायावर विश्वास आहे.
संपादकीय भूमिकापॅलेस्टाईन विषयी सहानुभूती दर्शवणार्या प्रियांका वाड्रा कधी काश्मिरी हिंदूंच्या, बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ काही बोलतील का ? |