शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या ! – हिंदु जनजागृती समिती
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराला महंमद युनूस उत्तरदायी !
मुंबई – बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथवून लावल्यानंतर डॉ. महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आले; मात्र युनूस यांच्या सत्ताकाळात हिंदूंवरील आक्रमणे, हत्या, लुटालूट, महिला आणि लहान मुले यांच्यावर अत्याचार, बलपूर्वक विस्थापन, मंदिरांचा विध्वंस यांमध्ये भयावह वाढ झाली आहे.
🚨 Muhammad Yunus is accountable for horrific acts of atrocities against Hindus in Bangladesh!
❌ Withdraw the ‘Person of the Year’ award given to Muhammad Yunus by Sharad Pawar! 🏆🚫
– @HinduJagrutiOrg #HindusUnderAttackInBangladesh #AllEyesOnBangladeshiHindus… pic.twitter.com/33rPMcCy9T— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 16, 2024
बांगलादेशामध्ये प्रतिदिन मानवतेची हत्या असतांना तेथील अल्पसंख्य हिंदु समाज, तसेच अन्य समूह यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात डॉ. महंमद युनूस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतात हिंदू आंदोलन करून तीव्र संताप व्यक्त करत आहेत. अशा मानवतेची हत्या करणार्या डॉ. महंमद युनूस यांना ‘सकाळ’ समूहाच्या वतीने वर्ष २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख आणि तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार तात्काळ मागे घेण्यात यावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –
|
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,
१. एरव्ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणाची आग्रही भूमिका मांडली जाते. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांकांप्रमाणेच बांगलादेशातील अल्पसंख्य असलेल्या हिंदु, बौद्ध, ख्रिस्ती आदी समाजाप्रती ती सहानुभूती का दाखवली जात नाही ?
२. बांगलादेशी हिंदु समाजाला भारतातील अल्पसंख्यांकांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का ? बांगलादेशातील हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध आदी अल्पसंख्य समुदायावरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतांना डॉ. महंमद युनुस यांची मूक बघ्याची भूमिका अनाकलनीय आहे.
३. ही भूमिका शांतता आणि मानवी हक्कविरोधी आहे. तरी त्यांना दिलेला पुरस्कार मागे घेण्याविषयी आणि या अत्याचारांविषयी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भूमिका स्पष्ट करायला हवी.