Bareilly Trishul Street Light Controversy : बरेली (उत्तरप्रदेश) येथील पथदिव्यांवर महापालिकेने लावले त्रिशूळ !

  • ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी यांचा आक्षेप !

  • त्रिशूळसमवेत अन्य धर्मांचाही सन्मान करण्याचे केले आवाहन, त्रिशुळाच्या वर हिरवा ध्वज लावण्याची दिली चेतावणी !

(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक आणि मुफ्ती म्हणजे शरीयत कायद्यानुसार न्यायनिवाडा करणारा)

त्रिशूळ केवळ पथदिव्यांवर लावल्यावरच मुसलमानांना ती टोचायला लागली !

बरेली (उत्तरप्रदेश) : बरेली शहरातील पथदिव्यांच्या खांबांवर त्रिशूळ बसवण्यात आल्याने नाराज झालेल्या ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी यांनी ‘महापालिका केवळ एका धर्माचा पुरस्कार करत आहे’, असा आरोप केला आहे. रजवी यांनी ‘त्रिशुळाच्या शेजारी हिरवा ध्वज लावू’ अशी चेतावणीही दिली.

त्रिशूळ पथदिव्यांवर लावल्यावर असा दिसेल !

मौलाना बरेलवी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

१. महानगरपालिका सुशोभीकरणाचे चांगले काम करत आहे; परंतु विद्युत् खांब, रस्ता दुभाजक (डिव्हायडर) इत्यादींवर त्रिशूळ बसवून विशिष्ट धर्माचा प्रचार आणि प्रसार करून शहराची प्रतिमा मलिन केली जात आहे. (त्रिशूळ लावल्याने शहराची प्रतिमा कशी मलिन होते ? हिंदूंच्या धार्मिक चिन्हाविषयी अशा प्रकारचे विधान केल्यावरून त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद होऊन त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक) इतर धर्म ओळखण्यासाठी त्रिशूळसमवेत काही गोष्टी जोडल्या गेल्यास मुसलमानांना आक्षेप असणार नाही. सरकारी मालमत्तेवर केवळ एकाच धर्माची ओळख लादल्यास प्रत्येक व्यक्तीचा आक्षेप असेल.

त्रिशुळाच्या वर हिरवा ध्वज लावण्याची चेतावणी देणारे मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी !

२. आपला देश ‘लोकशाही देश’ आहे, तो कोणत्याही विशिष्ट धर्माच्या अनुयायांचा देश नाही. (हिंदूंच्या धर्मानुसार सरकारने काही केले की, मुसलमानांना भारत ‘धर्मनिरपेक्ष देश’ असल्याचे आठवते; मात्र स्वतःच्या धर्मासाठी विविध मागण्या करतांना त्यांना ही गोष्ट का आठवत नाही ? – संपादक) राज्यघटना सर्व धर्मांना सन्मान देण्याचे बोलते. (यासाठीच देशात समान नागरी कायदा करण्यात आला पाहिजे, हे मौलाना यांनी आता मान्य केले पाहिजे ! – संपादक) महापालिकेने केवळ एका धर्माचा पुरस्कार केल्यास सर्वांची मने दुखावतील. (गेली ८ दशके भारतात एकाच धर्माचा पुरस्कार होत राहिल्याने हिंदूंची मने दुखावली जात होती, हे मौलाना यांना का दिसले नाही ? – संपादक) महापालिका असो कि अन्य कोणतीही सरकारी मालमत्ता, त्यावर सर्व धर्माच्या अनुयायांचा अधिकार आहे. (सोयीनुसार सूत्रे आठवणारे मुसलमान धर्मगुरु ! – संपादक)

३.  महानगरपालिकेचे महापौर डॉ. उमेश गायतम हे मुसलमानांना आवडतात. ते भाजपमधील पहिले व्यक्ती आहेत, ज्यांना मुसलमानही मतदान करतात. त्यांनी पक्षपाती वृत्ती अंगीकारू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्‍वास’ या घोषणेप्रमाणे वागायला हवे. विशिष्ट धर्माच्या प्रचाराचे सूत्र असेल, तर इतर धर्माच्या अनुयायांचा डॉ. उमेश गायतम यांच्यावरील विश्‍वासाला तडा जाईल. (एखादा मुसलमान मोठ्या पदावर पोचला, तर तो प्रथम स्वतःचा धर्म आणि धर्मबांधव यांचाच विचार करतो, त्याविषयी मौलाना का बोलत नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • त्रिशूळ केवळ पथदिव्यांवर लावल्यावरच मुसलमानांना ती टोचायला लागली आहे, यातून त्रिशूळमध्ये किती शक्ति आहे, हे लक्षात येते !
  • सोयीनुसार सर्व धर्मांचा आदर करण्याची भाषा करणारे मुसलमान स्वतःच्या धर्माविषयीच्या वेळी मात्र सर्व सोयीसुविधा लाटण्यास आघाडीवर असतात !