Tablighi Jamaat Banned In Kazakhstan : मुसलमानबहुल कझाकस्तानमध्ये कट्टरतावादी तबलिगी जमातच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई !
रस्त्यावरील नमाजपठणावर घातली बंदी !
अस्ताना (कझाकस्तान) : मध्य आशियाई देश कझाकस्तानने इस्लामी कट्टरतावादाला प्रोत्साहन देणार्यांवर कडक कारवाई केली आहे. देशात कट्टरतावादी विचारसरणी असलेल्या संघटनांवर बंदी घातली जात असून तबलिगी जमातवर (इस्लामी शिकवणींचा प्रचार करणारी संघटना) कडक कारवाई करण्यात आली आहे. देशातील पश्चिमेकडील शहरांमध्ये विशेषतः इस्लाम धर्माचा प्रचार करण्यासाठी येणार्या मंडळांवर कारवाई करण्यात आली आहे. देशातील सर्वांत मोठे शहर अल्माटी येथे वाहतूक बंद करून नमाजपठण करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
१. पश्चिम कझाकस्तानमध्ये तबलिगी जमातशी संबंधित अनेक प्रचारकांना अटक करण्यात आली आहे. हे लोक मशिदीत थांबून भाषणे देत होते आणि स्वतःचे विचार लोकांमध्ये पसरवत होते. त्यामुळे पोलिसांनी जमातशी संबंधित लोकांना अटक केली आहे. मध्य आशियातील बहुतांश देशांमध्ये तबलिगी जमातवर बंदी आहे.
२. अल्माटी शहरात रस्त्यावर नमाजपठण करण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती आणि रुग्णवाहिकेसारखी सेवाही ठप्प झाली होती. यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भविष्यात आपत्कालीन सेवा बंद पडू नये; म्हणून सरकार कडक कारवाई करत आहे.
बहुसंख्य मुसलमान असतांना कझाकस्तान धर्मनिरपेक्ष देश !कझाकस्तान हा मुसलमानबहुल देश आहे. इस्लाम ९ व्या शतकात कझाकस्तानमध्ये आला आणि तेव्हापासून येथे मोठ्या प्रमाणात लोक इस्लामचे पालन करत आहेत. आजही कझाकस्तानमधील सुमारे ७० टक्के लोक इस्लामला मानतात. तथापि कझाकस्तान इस्लामी राष्ट्र नाही. कझाकस्तानला राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष देश म्हटले आहे. |
३. गेल्या दशकात पाकिस्तानातील तबलिगी जमात आशियामध्ये त्याच्या कारवाया वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. कझाकस्तानच्या शेजारील देश किर्गिस्तान आणि रशिया यांमध्येही त्याने प्रवेश केला आहे.
४. मध्य आशिया आणि रशिया येथे हिजबुत-तहरीर या संघटनेवर बंदी आहे. जानेवारी २०२२ मध्ये कझाकस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणांमागे हिजबुत आणि तबलिगी जमात असल्याचे म्हटले जाते. या आक्रमणात अल्माटीमधील महत्त्वाच्या आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले आणि यात अनेकांना जीव गेला होता.
संपादकीय भूमिकामुसलमानबहुल देश जे करू शकतो, ते धर्मनिरपेक्ष भारत का करू शकत नाही ? |