कोल्‍हापूर महापालिकेच्‍या वतीने वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा सत्‍कार !

महापालिकेच्‍या वतीने वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांच्‍या सत्‍कारप्रसंगी उपस्‍थित विविध मान्‍यवर

कोल्‍हापूर – कोल्‍हापूर महापालिकेच्‍या ५२ व्‍या वर्धापनदिनाच्‍या निमित्ताने देशाच्‍या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्‍या वीर सैनिकांच्‍या, तसेच महापालिकेच्‍या अग्‍नीशमनदलात सेवा बजावत असतांना हुतात्‍मा झालेल्‍या सैनिकांच्‍या वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा सत्‍कार प्रशासक कार्तिकेयन एस्. यांच्‍या हस्‍ते शाल, साडीचोळी, रोप आणि पुस्‍तक देऊन करण्‍यात आला.

यात सैनिक निवृत्ती मरळे यांची सून उर्मिला मरळे, सैनिक लक्ष्मण रावराणे यांची सून स्‍मिता रावराणे, सैनिक जयसिंग भोसले यांची पत्नी श्रीमती कांचनदेवी भोसले, सैनिक सुनील चिले यांचे भाऊ अनिल चिले, सैनिक दिगंबर उलपे यांची आई श्रीमती आनंदी उलपे यांसह अन्‍यांचा समावेश होता. या वेळी अतिरिक्‍त आयुक्‍त राहुल रोकडे, उपायुुक्‍त साधना पाटील यांसह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्‍थित होते.