मुख्य लेखापालांना अटक !
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक अपहाराचे प्रकरण
कोल्हापूर – ‘आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्या’त झालेल्या २९ कोटी ५८ लाख ३२ सहस्र रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह २१ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. यात कारखान्याचे मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर यांना गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अन्य संशयितांना लवकरच कह्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले, तसेच डॉ. शहापूरकर हे अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी तत्कालीन सचिव मानसिंह देसाई यांच्यावरही गुन्हा नोंद झाला आहे; मात्र त्यांचा ३ दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे.