मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाचा ३९ आमदारांचा शपथविधी पार पडला !
राजभवन (नागपूर) येथे शपथविधी सोहळ्याचे आयोजन
नागपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार येथील राजभवनमध्ये करण्यात आला. या अंतर्गत ३९ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यांमध्ये भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापासून शपथविधीला प्रारंभ झाला. या वेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.
या वेळी भाजपचे चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे-पालवे, गणेश नाईक, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, अतुल सावे, संजय सावकारे, अशोक उईके, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर, पंकज भोयर, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, तर शिवसेनेचे दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, योगेश कदम, आशिष जैस्वाल, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
🎉 Big News from Maharashtra! 🎉
39 new ministers join Devendra Fadnavis’ cabinet. 🔄
🔹 BJP: 19 ministers
🔹 NCP: 9 ministers
🔹 Shiv Sena: 11 ministers
🚩 Big moment in Nagpur!
Several Mahayuti MLAs proudly chanted ‘Jai Shri Ram’ after taking their oath 🚩
Nitesh Rane… pic.twitter.com/pNSGn6C1ck
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 15, 2024
वैशिष्ट्यपूर्ण
१. भाजपचे ज्येष्ठ नेते मंगलप्रभात लोढा यांनी संस्कृत भाषेतून मंत्रीपदाची शपथ घेतली.
२. भरतशेठ गोगावले यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना स्मरून शपथ घेतली
प्रतिक्रिया
१. मंत्री नितेश राणे – जे दायित्व मिळेल, त्यातून राज्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांना अभिप्रेत असा महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करीन !
क्षणचित्रे
१. मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नरहरी झिरवाळ यांनी ‘जय श्रीराम’ची घोषणा दिली.
२. राज्यमंत्री म्हणून माधुरी मिसाळ, आशिष जैयस्वाल, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर, इंद्रनील नाईक, योगेश कदम यांनी शपथ घेतली.