हिवाळी अधिवेशनात २० विधेयके येणार आहेत ! – देवेंद्र फडणवीस, मुख्‍यमंत्री

मंत्रीमंडळ विस्‍तारानंतर झालेली पत्रकार परिषद

देवेंद्र फडणवीस

नागपूर – येत्‍या २ दिवसांत खातेवाटप होईल. अधिवेशनात २० विधेयके येणार आहेत. आतापासून गतीशील कारभार चालू करण्‍यात आला आहे. इ.व्‍ही.एम्.च्‍या संदर्भात विरोधकांचा नॅरेटिव्‍ह (खोटे कथानक) मांडण्‍याचा प्रयत्न झाला. विरोधकांच्‍या सगळ्‍या प्रश्‍नांची उत्तरे देणार. आमची सगळ्‍या प्रकारच्‍या चर्चेची सिद्धता झाली आहे, असे विधान मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ डिसेंबर या दिवशी मंत्रीमंडळ विस्‍तारानंतर झालेल्‍या पत्रकार परिषदेत केले. या वेळी उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्‍थित होते.

समृद्ध महाराष्‍ट्र हेच महायुतीचेे मिशन ! – एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री

समृद्ध महाराष्‍ट्र हेच महायुतीचेे मिशन आहे. देवेंद्र फडणवीस ‘पुन्‍हा येईन’ म्‍हणाले होते आणि ते आले ! जनतेने विश्‍वास ठेवल्‍याने हे साध्‍य झाले. फडणवीसांचा ५ वर्षांचा अनुभव कामी आला. आता कायम फडणवीसांच्‍या पाठीशी उभे रहाणार. पदाच्‍या संदर्भात कोणतीही नाराजी नाही. आम्‍ही गतीमान निर्णय घेऊ. अडीच वर्षांसाठी मंत्रीपद हा पक्षाचा निर्णय आहे.