Mahakumbh Anti-Drone Security : महाकुंभपर्वात भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘हवाई पहारा’

प्रयागराज – येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्‍या महाकुंभपर्वात येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी ड्रोन’ यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे  विनाअनुमती उडवण्यात येणारे ड्रोन निष्क्रीय करण्यात येणार असून असे ड्रोन उडवणार्‍यांना कठोर कारवाईही केली जाणार आहे. यंदाच्या महाकुंभपर्वात देश-विदेशांतून ४० कोटी भाविक येण्याचा दावा उत्तरप्रदेश सरकारने केला असून भाविकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करण्यात येणार आहे.

पहिल्याच दिवशी पकडले २ अवैध ड्रोन !

महाकुंभपर्वात १४ डिसेंबर या दिवशी २ अवैध ड्रोन पकडून ते निष्क्रीय करण्यात आले. पोलिसांनी संबंधितांना नोटिसाही बजावल्या आहेत.