Sheikh Hasina : बांगलादेशात सहस्रावधी लोक बेपत्ता होण्यामागे शेख हसीना यांचा हात असल्याचा तेथील सरकारचा कांगावा

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या अंतरिम सरकारने स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने त्याच्या अंतरिम अहवालात म्हटले आहे की, ३ सहस्र ५०० पेक्षा अधिक लोकांच्या कथितपणे बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा सहभाग असल्याचे आढळले आहे.

सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांच्या कार्यालयाच्या प्रसिद्धीमाध्यम शाखेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयोगाला पुरावे मिळाले आहेत की, माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्या सूचनेनुसार लोक बेपत्ता झाले होते. पंतप्रधानांचे संरक्षण सल्लागार मेजर जनरल (निवृत्त) तारिक अहमद सिद्दीकी, राष्ट्रीय दूरसंचार देखरेख केंद्राचे माजी महासंचालक आणि मेजर जनरल झियाउल अहसान, वरिष्ठ पोलीस अधिकारी मोनिरुल इस्लाम आणि महंमद हारुन-ओर-रशीद आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी यांना बडतर्फ केले. या घटनांमध्ये अटक करण्यात आलेले हे सर्व माजी सैन्याधिकारी पसार आहेत.

संपादकीय भूमिका

शेख हसीना यांच्या कार्यकाळाऐवजी गेल्या ऑगस्टपासून देशात झालेल्या आक्रमणांत किती हिदूंच्या हत्या झाल्या, किती हिंदु महिला बेपत्ता झाल्या, किती महिलांवर बलात्कार झाले, यांची खरी माहिती का सांगितली जात नाही ?