(म्हणे) ‘आज आपण अल्पसंख्य असलो, तरी एकेदिवशी आपण बहुसंख्य होऊ !’ – फिरहाद हकीम, तृणमूल काँग्रेस

बंगालचे तृणमूल काँग्रेस सरकारचे मंत्री फिरहाद हकीम यांचे हिंदूंमध्ये दहशत निर्माण करणारे विधान

फिरहाद हकीम

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये आपण (मुसलमान) ३३ टक्के आहोत आणि संपूर्ण देशात १७ टक्के आहोत. आपण संख्येने अल्पसंख्य असू शकतो; परंतु अल्लाची कृपा झाली, तर एकेदिवशी आपण बहुसंख्य होऊ शकतो. जर अल्लाची कृपा झाली, तर आपण हे साध्य करू शकतो. त्या वेळी आपल्याला न्यायासाठी मेणबत्ती लावण्याची आवश्यकता भासणार नाही. आपण अशा स्थितीत असू, जिथे आपला आवाज आपोआप ऐकू येईल आणि न्यायासाठी आपले आवाहन ऐकले जाईल, असे विधान बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. भाजपने हकीम यांच्या विधानावर टीका केली आहे.
हकीम पुढे म्हणाले की, न्यायव्यवस्थेत मुसलमान न्यायाधिशांची संख्या वाढली पाहिजे. ही संख्या सक्षमीकरण आणि कठोर परिश्रम यांद्वारे भरून काढता येईल. आमचा विश्‍वास आहे की, अल्पसंख्य समुदायाचे सदस्य राष्ट्राच्या प्रगतीसाठी इतर समुदायांसमवेत एकत्र काम करतात.

अशी विधाने भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्यासारखी ! – केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार

केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार

केंद्रीय मंत्री आणि बंगालचे भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, हकीम उघडपणे धार्मिक द्वेष भडकवत आहेत आणि धोकादायक कार्यसूची पुढे करत आहेत. हे केवळ द्वेषयुक्त भाषण नाही. अशी विधाने भारतात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करू शकतात. इंडी आघाडी यावर गप्प का? यावर त्यांचे मत मांडण्याचे मी त्यांना आव्हान देतो. आपला देश आपल्या एकात्मतेला आणि अखंडतेला असणारे असे धोके सहन करणार नाही.

स्थिती अतिशय चिंताजनक ! – भाजपचे नेते अमित मालवीय

भाजपचे नेते अमित मालवीय

भाजपचे माहिती-तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी हकीम यांच्या विधानावर टीका करतांना म्हटले की, फिरहाद हकीम यांनी दावा केला आहे की, बंगाल लवकरच मुसलमान बहुसंख्य होईल. हकीम यांनी अशा भविष्याची कल्पना केली आहे, जिथे मुसलमान यापुढे शांततापूर्ण निदर्शने किंवा मोर्चे यांवर अवलंबून रहाणार नाहीत; परंतु कायदा स्वतःच्या हातात घेतील. ते शरीयत कायद्याकडे बोट दाखवत असल्याचे दिसते. ही स्थिती अतिशय चिंताजनक आहे. कोलकात्याच्या मोठ्या भागांमध्ये, विशेषतः झोपडपट्टी भागांत रोहिंग्यांसह घुसखोरांचे वर्चस्व आहे. हकीम यांच्या वक्तव्यावरून बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या आणखी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे लोकसंख्याशास्त्रीय पालट होऊ शकतो.

संपादकीय भूमिका

  • बंगालमध्ये मुसलमान बहुसंख्य झाल्यावर जे बांगलादेशात आता चालू आहे, तेच बंगालमध्ये होतांना दिसेल आणि ममता बॅनर्जी यांनी बंगाल सोडून अन्य राज्यांत आश्रय घ्यावा लागेल ! असे होण्यापूर्वी बंगालमधील हिंदूंनी जागृत होऊन तेथे हिंदुत्वनिष्ठांचे सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे !
  • राज्य सरकारमधील एक मंत्री उघडपणे असे विधान करतो, यावरून त्यांची या संदर्भात सिद्धता असणार, हे स्पष्ट होते. सर्वधर्मसमभावाच्या गुंगीत असणारे हिंदू आतातरी शुद्धीवर येतील, अशी अपेक्षा !