दुबई आणि लंडन येथील वयोवृद्ध नागरिक घेत आहेत दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ !
पणजी, १४ डिसेंबर (वार्ता.) – गोवा सरकारच्या सामाजिक कल्याण खात्याच्या ‘दयानंद सामाजिक सुरक्षा योजने’चे काही लाभार्थी दुबई आणि लंडन येथील ज्येष्ठ (वयोवृद्ध) नागरिक आहेत, तसेच या योजनेतील काही लाभार्थी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतही वास्तव्यास आहेत, अशी माहिती उघडकीस आली आहे. सामाजिक कल्याण खात्याने योजनेच्या लाभार्थींचे सर्वेक्षण करणे चालू केले आहे आणि या वेळी ही माहिती उघड झाली आहे.
गोवा सरकार दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमास २ सहस्र रुपये देते. सामाजिक कल्याण खात्याने सध्या या योजनेच्या ८० वर्षांवरील लाभार्थींचे सर्वेक्षण करणे चालू केले आहे. या योजनेचे ८० वर्षांवरील २६ सहस्र लाभार्थी आहेत, तर यातील ४ सहस्र लाभार्थींचा मृत्यू झालेला आहे. खात्याने लाभार्थीच्या मृत्यूनंतरही योजनेचा लाभ घेतलेल्यांना संबंधित रक्कम परत करण्यास सांगितले आहे.
संपादकीय भूमिकाजनतेतच असा अप्रामाणिकपणा असेल, तर त्यांना भ्रष्टाचारमुक्त शासनकर्ते तरी कसे मिळणार ? |