स्वामी विवेकांनद यांनी सांगितलेली प्रार्थना
हे प्रभो, सगळ्या जगाला तुम्ही पूजनीय आहात. आम्ही तुम्हाला वंदन करतो. तुम्ही संसाराची बंधने छिन्नभिन्न करून टाकता, तुम्ही निरंजन आणि शुद्धस्वरूप आहात. तुम्ही निर्गुण असूनही दिव्य गुणांनी युक्त आहात. तुम्ही मनाचे आणि वाणीचे आधार आहात आणि तरीही तुम्ही या दोहोंच्याही पलीकडे आहात. तुम्हीच सुरक्षित असे आश्रयस्थान आहात.’
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)