श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने
चिंतन करणे
एखाद्याने त्याची चूक मनापासून लगेच स्वीकारली, तर त्याला पुन्हा त्या चुकीसाठी चिंतन करायला सांगण्याऐवजी पुढच्या टप्प्याचे शिकवायला हवे; कारण त्या साधकाला त्या चुकीची जाणीव झालेली आहे; पण ज्याला अजूनही तशी जाणीव झाली नसेल, तर त्याने मात्र चिंतन करणे आवश्यक आहे.
वाणीचे महत्त्व
देव आपल्या वाणीतून आपल्याला ‘काय बोलायचे ?’ हे शिकवतो. त्यासाठी आपली वाणी सात्त्विक आणि सुशीलच असायला हवी. आपली वाणीच आपल्याला ‘तथास्तु !’ (‘असेच घडो’) असे म्हणते.