‘महावितरण अभय योजने’त होणार ४० सहस्र प्रकरणांची तडजोड !
अधिकाधिक ग्राहकांनी लोकअदालतीद्वारे वीज चोरीत तडजोड करून मुक्त होण्याचे आवाहन !
वडगाव मावळ (जिल्हा पुणे) – जिल्ह्यात १४ डिसेंबरला आयोजित करण्यात येणार्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वीजचोरीच्या १२२, तर ‘महावितरण अभय योजना – २०२४’अंतर्गत दाखलपूर्व ४० सहस्रांहून अधिक तडजोडयुक्त प्रकरणे निवडण्यात आली आहेत. अशी माहिती पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली. पुणे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या द्वारे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये वीजचोरी आणि थकबाकी यांची प्रकरणे पुणे शहर अन् जिल्ह्यातून प्रविष्ट प्रकरणे निवडण्यात आली आहेत. यामध्ये ग्राहकांना विविध सवलती मिळणार आहेत. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरण यांनी केले आहे.
अधिकाधिक ग्राहकांनी लोकअदालतीद्वारे वीजचोरीत फौजदारी आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित प्रकरणात तडजोड करून मुक्त व्हावे, असे आवाहन प्रभारी जिल्हा न्यायाधीश वडगाव मावळ डी.के. अनभुले, सचिव सोनल पाटील आणि महावितरण यांनी केले आहे.
संपादकीय भूमिका
|