महापालिका प्रशासनाकडून शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निविदांना दर अल्प आल्याने दर्जाविषयी प्रश्न ?
पुणे – शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दुरुस्ती आणि डांबरीकरण यांसाठी महापालिका प्रशासनाने १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या निविदा २० ते ३५ टक्क्यांपर्यंत अल्प दराने आल्याने ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाची कामे केली जातील का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरात पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, भ्रमणभाष आस्थापनांच्या केबल, गॅस वाहिनी टाकणे यांसह अन्य कारणांसाठी रस्ते खोदले जातात. काम झाल्यानंतर डांबर टाकून हे खड्डे बुजवले जातात; पण काही दिवसांनी खोदलेल्या रस्त्याचा भाग खचल्याने रस्त्यावर खड्डे पडून चाळण झालेली असते. पावसाळ्यात महापालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते; पण रस्ते ओबडधोबड, असमान पातळीमध्ये असल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास होऊन वाहतुकीची गती मंदावते. पथ विभागाने शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यांसह अन्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यातील ५ ठेकेदारांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
महापालिका प्रशासनाने आपल्या सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवण्याचे आवाहन केले आहे.