श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा १७ डिसेंबरपासून !
पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव’ पुरस्कार घोषित !
चिंचवड (जिल्हा पुणे) – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळा १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थ यांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम आणि उपशास्त्रीय आणि सुगम संगीत, तसेच व्याख्यान, आरोग्य आणि रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे ४६३ वे वर्ष आहे. या विषयाची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी १२ डिसेंबरला पत्रकार परिषदेत दिली. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवन गौरव’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
महोत्सवाचे उद्घाटन आणि वर्ष २०२५ च्या दिनदर्शिकेचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या शुभहस्ते १७ डिसेंबरला सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.