‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !
साधकांना सूचना
१४.१.२०२५ या दिवशी मकरसंक्रांत, तर ४.२.२०२५ या दिवशी रथसप्तमी आहे. या कालावधीत सुवासिनी स्त्रिया अन्य स्त्रियांना भांडी, प्लािस्टकच्या वस्तू किंवा नित्योपयोगी साहित्य वाण म्हणून देतात. वाण द्यावयाची वस्तू अधिक संख्येत विकत घ्यायची असल्यास त्याची मागणी आतापासूनच करावी लागते.
सनातनचे ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने वाण म्हणून देण्यास सर्वाेत्तम आहेत. त्यामुळे साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.
वाण देण्यासाठी समाजातून ग्रंथ वा उत्पादने यांची मागणी आल्यास साधकांनी ती स्थानिक वितरकांकडे द्यावी.