श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची कृपा अनुभवणारे पू. संजीव कुमार !
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने देहलीहून बेंगळुरू येथे स्थलांतरीत होणे
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या कृपेने आम्ही फेब्रुवारी २०२४ मध्ये देहलीच्या प्रदूषित वातावरणापासून दूर असलेल्या आणि हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या बेंगळुरू (कर्नाटक) या सुंदर शहरात रहायला आलो.
२. सुनेला चौथ्या टप्प्याचा कर्करोग होणे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘ती बरी होणार’, असे ठामपणे सांगणे अन् त्यांच्याच कृपाशीर्वादाने सुनेच्या प्रकृतीत सुधारणा होत असणे
९.३.२०२४ या दिवशी मला माझ्या मुलाचा भ्रमणभाष आला. तो मला म्हणाला, ‘‘बाबा, सौ. कनिकाला कर्करोग झाला असून तो चौथ्या टप्प्याचा असल्याचे निदान झाले आहे. मला माझे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे.’’ मी याविषयी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगितले. त्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपाशीर्वादाने थोड्याच दिवसांत सौ. कनिकाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.
काही मासांपूर्वी माझ्या मुलाने श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना विचारले, ‘‘माझी पत्नी कनिका बरी होईल का ?’’ त्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘का नाही बर्या होणार ?’’ त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यांत अश्रू आले. कनिकाला चौथ्या टप्प्याचा कर्करोग होऊनही श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘ती बरी होणार’, असे ठामपणे सांगितले. त्यानुसार त्यांच्याच कृपाशीर्वादाने गेल्या ९ मासांपासून सौ. कनिकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे आणि ‘ती लवकरच बरी होईल’, असे आम्हाला वाटत आहे.’
– (पू.) संजीव कुमार (सनातनचे ११५ वे [समष्टी] संत, वय ७३ वर्षे), बेंगळुरू (२२.११.२०२४)