‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ब्रह्मा, विष्णु, महेश आणि परब्रह्म स्वरूप आहेत !’ – पू. संजीव कुमार
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ साक्षात् एक दिव्य अनुभूती आहेत. त्यांचे वर्णन शब्दांत करणे माझ्यासाठी अशक्य आहे. त्यांच्याकडून मला साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शन मिळाले. त्यांच्याच कृपेने माझे जीवन आता आनंदमय झाले आहे. त्यांनी माझ्या सर्व दुःखांचे निवारण केले आहे. त्यांनी मला ज्ञान आणि भक्ती प्रदान केली आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।
अर्थ : गुरु हेच ब्रह्मा, गुरु हेच सर्वव्यापक भगवान विष्णु आणि गुरु हे शंकर आहेत. एवढेच नव्हे, तर ते साक्षात् परब्रह्म (ईश्वराचा ईश्वर) आहेत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.
माझ्यासाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याच ब्रह्मा, विष्णु, महेश आणि परब्रह्म आहेत.’
– पू. संजीव कुमार (सनातनचे ११५ वे [समष्टी] संत, वय ७३ वर्षे), बेंगळुरू (२२.११.२०२४)