Israel On UNREST B’DESH : बांगलादेशात हिंदूंच्या संदर्भात जे चालू आहे ते अस्वीकार्य आहे !

इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी यांची बांगलादेशावर टीका !

इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी

मुंबई : जेव्हा आपल्या प्रियजनांवर अत्याचार होतो, तेव्हा कसे वाटते, हे आम्हाला ठाऊक आहे. गुन्हेगारांकडून मुली आणि मुले यांची हत्या करणे काय आहे, हे आम्ही अनुभवले आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकार असतांना हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत आणि हे वास्तव आंतरराष्ट्रीय समुदायापासूनही लपून राहिलेले नाही. तिथे जे काही चालले आहे, ते अस्वीकार्य आहे, अशा शब्दांत इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी यांनी टीका केली आहे. ते येथे आयोजित ‘वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम २०२४’ मध्ये बोलत होते. इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याबद्दल शोशनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकार यांचे आभार व्यक्त केले.

कोबी शोशनी म्हणाले की, इस्रायल आणि भारत या दोघांमध्ये सुरक्षा आणि आतंकवाद यासंबंधीच्या आव्हानांमध्ये साम्य आहे. आमची कौटुंबिक मूल्ये, परंपरा, चालीरीती, सामाजिक रचना आणि आतंकवाद यांविरुद्धची आमची लढाई यामुळे आमचे भारतावर प्रेम आहे.

संपादकीय भूमिका

भारतात अन्य देशांचे महावाणिज्यदूत आणि राजदूत आहेत; मात्र त्यांच्यापैकी कुणीही बांगलादेशातील हिंदूंविषयी बोलत नाहीत, हे लक्षात ठेवा !