Rishikesh : ऋषिकेश (उत्तरखंड) येथे विद्यार्थिनी टिळा लावून आल्याने शिक्षिकेने टिळा पुसण्यास भाग पाडले !
हिंदु संघटनांनी आंदोलन केल्यानंतर मुख्याध्यापकांची क्षमायाचना !
ऋषिकेश (उत्तराखंड) – येथे कपाळावर टिळा लावून शाळेत आलेल्या ८ वीतील एका विद्यार्थिनीला वर्गातून बाहेर काढण्यात आल्याने संतप्त झालेल्या हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला घेराव घातला. मुख्याध्यापकांनी ‘भविष्यात असे होणार नाही’, असे आश्वासन दिल्यानंतर प्रकरण शांत झाले.
टिळा लावून आल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढले आणि टिळा पुसून वर्गात येण्यास सांगितले. त्यावर ती टिळा पुसून वर्गात आली. घरी गेल्यानंतर तिने पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर दुसर्या दिवशी विद्यार्थिनीच्या कुटुंबियांसह राष्ट्रीय हिंदु शक्ती संघटना, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या कार्यकर्त्यांनी शाळेत पोचून मुख्याध्यापकांना घेराव घातला. यावर मुख्याध्यापकांनी शिक्षिकेच्या वतीने लेखी क्षमा मागितली. त्यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि ‘भविष्यात अशी घटना घडणार नाही’, अशी ग्वाही दिली.
संपादकीय भूमिकापुन्हा असे करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक शिक्षण खात्यानेच निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळी पालक आणि हिंदु संघटना यांनी आंदोलन करत रहायचे का ? |