पिंपरी (पुणे) येथे कारवाई करू नये म्‍हणून दुचाकीस्‍वाराची महिला पोलिसाला शिवीगाळ !

पिंपरी – वाहनावर कारवाई करू नये म्‍हणून दुचाकीचालकाने महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ केल्‍याची घटना जुन्‍या पुणे-मुंबई महामार्गावर खराळवाडी येथे घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार महिलेने पिंपरी पोलीस ठाण्‍यात दिलेल्‍या तक्रारीवरून तुषार क्षीरसागर याला अटक केली आहे. तुषार १० डिसेंबरला सकाळी दुचाकीवरून पुणे-मुंबई महामार्गावरून जात होता. तेव्‍हा खराळवाडी येथून साई चौकाकडे जाणार्‍या रस्‍त्‍यावर पिंपरी वाहतूक पोलिसांनी त्‍याची दुचाकी अडवली. पोलिसांनी त्‍याच्‍या दुचाकीवर कारवाई करू नये, यासाठी त्‍याने पोलीस महिलेला शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

संपादकीय भूमिका

कायद्याचा धाक नसल्‍यामुळे उर्मट झालेली जनता शिक्षेस पात्र आहे !