सर्वसामान्य व्यक्तीवर गुन्हा नोंद होतो तसा शरद पवार यांना नियम लागू होणार का ? – महंत सुधीरदासजी महाराज
शरद पवार यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापल्याचे प्रकरण !
नाशिक – सर्वसामान्य व्यक्तीने वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापला, तर पोलीस गुन्हा नोंद करतात. याउलट शरद पवार हे ज्येष्ठ नेते असल्याने त्यांना महाराष्ट्र राज्यातच नाही, तर देशभरात कुठले कायदे लागू होतात का ? हाच मोठा प्रश्न आहे. त्यांना वाढदिवसाच्या मी शुभेच्छा देतो; मात्र शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने तलवारीने केक कापणे उचित नाही, असे मत नाशिक येथील काळाराम मंदिराचे महंत सुधीरदासजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यांच्या ८४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने तलवारीने केक कापल्याचा ‘व्हिडिओ’ सगळीकडे प्रसारित झाला आहे. त्यावर महंत सुधीरदासजी महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याच समवेत सामाजिक माध्यमांवरही अनेक लोकांकडून हाच प्रश्न विचारण्यात येत आहे.