शहेजाद शेख आणि बरकतअली रईस पाशा यांच्‍यावर तातडीने कारवाई करण्‍याची मागणी

अल्‍पवयीन मुलीवरील अत्‍याचाराचे प्रकरण

गडहिंग्‍लज (कोल्‍हापूर) – गडहिंग्‍लज येथील शहेजाद शेख आणि बरकतअली रईस पाशा यांनी अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्‍याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीच्‍या वतीने प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्‍यात आले. या प्रसंगी ‘लव्‍ह जिहादविरोधी’ कठोर कायदा करावा, तसेच धर्मांतरबंदी कायदा करावा, अशीही मागणी निवेदनात करण्‍यात आली आहे. या प्रसंगी बजरंग दलाचे श्री. विश्‍वनाथ पाटील, श्री. तुषार रणदिवे, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे श्री. सचिन पाटील, भाजपचे श्री. संतोष तेली, श्री. सुभाष चोथे, श्री. अनिल खोत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय मुरकुटे यांसह अन्‍य हिंदुत्‍वनिष्‍ठ उपस्‍थित होते.

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ?