US Russia Relations : अमेरिकी नागरिकांनी रशियात, तर रशियाच्या नागरिकांनी अमेरिकेत जाऊ नये !
अमेरिका आणि रशिया यांचा एकमेकांच्या नागरिकांना सल्ला !
मॉस्को (रशिया) : रशियाने त्याच्या नागरिकांना अमेरिका, कॅनडा आणि युरोप खंड येथे प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. रशियाने नागरिकांना स्पष्टपणे सांगितले आहे की, ते अमेरिका किंवा युरोपातील देशांमध्ये गेल्यास अमेरिकी अधिकारी त्यांना अटक करू शकतात किंवा कह्यात घेऊ शकतात. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन हा सल्ला दिला.
अमेरिकेनेही त्याच्या नागरिकांना रशियामध्ये न जाण्याचा दिला सल्ला !
रशियाप्रमाणेच अमेरिकेनेही त्याच्या नागरिकांना सावध केले आहे. यासंदर्भात अमेरिकेने नोटीस जारी केली आहे. त्यात म्हटले आहे की, जर ते रशियाला गेले, तर त्यांना रशियाच्या सुरक्षा अधिकार्यांकडून त्रास होऊ शकतो किंवा कह्यात घेतले जाऊ शकते.