‘श्री दत्तगुरूंच्या कृपेने अतृप्त लिंगदेहाच्या त्रासापासून मुक्ती मिळाली’, अशी स्वप्नाद्वारे साधिकेला आलेली अनुभूती
१. स्वप्नात लिंगदेह त्रास देत असतांना सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना याचना करणे
‘१५.९.२०२४ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये ‘मला एका अतृप्त स्त्रीचा लिंगदेह त्रास देत आहे’, असे दिसले. तो लिंगदेह माझ्या शरिरात प्रवेश करायचा. त्या वेळी माझी पुष्कळ चिडचिड व्हायची आणि त्यामुळे माझे कुटुंबीय अन् साधक यांनाही त्रास व्हायचा. तो लिंगदेह काही काळ माझ्या शरिरात प्रवेश करायचा आणि नंतर बाहेर पडायचा. स्वप्नात लिंगदेह माझ्या शरिरातून बाहेर पडल्यावर त्याच्यापासून रक्षण व्हावे; म्हणून मी पळू लागले. मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना याचना करू लागले, ‘परम पूज्य गुरुदेव, मला वाचवा, माझे रक्षण करा !’
२. दत्तगुरूंनी साधिकेचे केलेले रक्षण
२ अ. लिंगदेहापासून रक्षण होण्यासाठी साधिका एका मंदिरात जाणे, ‘ते मंदिर श्री दत्तात्रेयांचे आहे’, हे लक्षात आल्यावर तिने प्रार्थना करणे आणि लिंगदेहाला मंदिरात येता न येणे : नंतर तो लिंगदेह माझ्या पाठीमागेच लागला. मी धावत असतांना मला एक मंदिर दिसले आणि मी मंदिरात गेले. माझ्या पाठीमागून आलेल्या लिंगदेहाला त्या मंदिरात प्रवेश करता आला नाही. मी मंदिरातील मूर्तीकडे पाहिले, तर ती मूर्ती साक्षात् श्री दत्तात्रेयांची होती. मी श्री गुरुदेव दत्तात्रेयांना याचना करू लागले, ‘हे भगवान द तुम्हीच मला वाचवा. या लिंगदेहापासून तुम्हीच माझे रक्षण करा. तुमच्याविना कुणीही माझे रक्षण करू शकत नाही.’
२ आ. प्रार्थना करत असतांना एक दिव्य गाय समोर दिसणे आणि ‘गायीच्या रूपात साक्षात् दत्तगुरुच आले आहेत’, असे जा : मी प्रार्थना करत असतांना माझ्यासमोर एक दिव्य गाय उभी राहिली. ती पांढरीशुभ्र आणि तेजोमय होती. तिचे दिव्य रूप पाहून माझे देहभानच हरपले. नंतर मी त्या गायीचे समोरील दोन्ही पाय घट्ट धरले. ‘गायीच्या रूपात साक्षात् दत्तगुरुच उभे आहेत’, असे मला प्रकर्षाने जा होते. मी गायीचे पाय घट्ट धरून तशीच बसले होते. त्यानंतर ‘त्या लिंगदेहाचे काय झाले ?’ हे मला समजलेच नाही. नंतर ही अनुभूती मी कुटुंबियांना सांगितली. तेव्हा ‘दोनच दिवसांनंतर पितृपक्ष चालू होत आहे’, हे माझ्या लक्षात आले.
– सौ. उर्मिला भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.९.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |