Rajnath Singh Slams INC On CONSTITUTION : काँग्रेसच्या राजवटीत एकूण ६२ वेळा झाले घटनेत पालट !

‘संविधान दिना’च्या निमित्ताने संसदेत काँग्रेसवर जोरदार टीका

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची काँग्रेस पक्षावर जोरदार टीका

नवी देहली : संसदेत ‘संविधान दिना’च्या निमित्ताने झालेल्या चर्चेच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसचे लोक राज्यघटनेच्या रक्षणाविषयी बोलत आहेत; पण राज्यघटनेचा कुणी अपमान केला, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाच्या राजवटीत एकूण ६२ वेळा घटना पालटण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. (६२ वेळा देशाची घटना पालटणार्‍या काँग्रेसने ‘संविधान बचाव’ची भाषा करणे, हे हास्यास्पद वाटल्यास त्यात चूक ते काय ? – संपादक)

राजनाथ सिंह म्हणाले की,

पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पंतप्रधान असतांना  १७ वेळा राज्यघटना पालटण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या काळात राज्यघटनेत तब्बल २८ वेळा पालट करण्यात आले. राजीव गांधी यांच्या काळात १० वेळा आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात ७ वेळा राज्यघटना पालटण्यात आली.
तत्कालीन काँग्रेस सरकारांनी बहुतांश घटनादुरुस्ती एकतर विरोधक आणि टीकाकार यांना गप्प करण्यासाठी किंवा चुकीची धोरणे राबवण्यासाठी केल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला.