विशालहृदयी आणि प्रीतीचा अथांग सागर असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘निरपेक्ष प्रेमा’चे (‘प्रीती’चे) सगुण रूप असून नित्य मातृरूपात असतात. सर्व साधकांप्रती त्यांचा वात्सल्यभाव आहे. आम्ही काही साधक त्यांच्या समवेत सेवा करतो.
छायाचित्रामध्ये दिसत आहे, तो असाच एक सुंदर क्षण ! वर विशाल आकाश, समोर अथांग समुद्र आणि विशालहृदयी आणि प्रीतीचा अथांग सागर असलेल्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ ! त्या वेळी त्या सांगत होत्या, ‘‘हा समुद्र आणि हे आकाश किती व्यापक आहे’, हे तुम्ही कधी अनुभवले आहे का ? समुद्र कुणालाही कधी ‘नाही’ म्हणत नाही. समुद्राप्रमाणेच आपल्यातील व्यापकत्व वाढले पाहिजे. गुरुकार्य करतांना आपण कोणत्याही सेवेला कधी ‘नाही’ म्हणू नये. ‘जी सेवा मिळेल, ती करत रहाणे’, हीच आपली साधना आहे.’’ त्यांच्यातील ‘निरागसपणा आणि प्रीती’ यांची अनुभूती आम्हा साधकांना देतांनाचा हा एक अपूर्व क्षण होता.
– श्री. स्नेहल मनोहर राऊत, कांचीपूरम्, तमिळनाडू. (७.१२.२०२४)