UP Barabanki Cow Smugglers : उत्तरप्रदेशात मुसलमान गोतस्कर हिंदु वेश धारण करून गोरक्षक असल्याचा करत आहेत बनाव !
गोतस्करीमध्ये हिंदूंचाही सहभाग !
बाराबंकी (उत्तरप्रदेश) : येथे झालेल्या चकमकीनंतर पोलिसांनी ७ मुसलमान गोतस्करांना अटक केली आहे. हे सर्व हिंदु गोरक्षक असल्याचे भासवून गायींची तस्करी करत असत. गायींना हत्येसाठी घेऊन जातांना ते समाजाला गोरक्षक असल्याचे दाखवण्यासाठी गळ्यात भगवा रुमाल बांधायचे आणि कपाळावर टिळा लावून चालायचे. त्यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद आहेत. मुसलमानांच्या व्यतिरिक्त काही हिंदूही गोतस्करीत गुंतलेले आढळले आहेत. (हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी ! – संपादक) त्यांना अटकही झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की,
१. ८ डिसेंबर २०२४ च्या रात्री त्यांना येथील जंगलात गोतस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोचल्यावर या तस्करांनी गोळीबार केला. याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात सरवर आणि गुफरान यांच्या पायाला गोळी लागल्याने ते घायाळ झाले. पोलिसांनी त्यांच्यासह अंकुल, उमर, नवजान, इरफान आणि अझीझ यांना अटक केली आहे.
स्वाट/सर्विलांस व थाना सतरिख #barabankipolice की संयुक्त टीम द्वारा पुलिस मुठभेड़ में 02 घायल सहित कुल 07 गौ तस्करों को किया गया गिरफ्तार, कब्जे से अवैध तमंचा, कारतूस व घटना में प्रयुक्त 02 अदद चार पहिया वाहन, 01 अदद मोटर साइकलि व अन्य सामान बरामद –#UPPolice pic.twitter.com/BpLxRmjbSV
— Barabanki Police (@Barabankipolice) December 9, 2024
२. पोलिसांनी त्यांच्याकडून २ पिस्तूल आणि एक मोठा सुरा जप्त केला आहे. त्यांच्याकडून एक गायही जप्त करण्यात आली आहे. हे मुसलमान गोतस्कर जवळच्या भागातून गायी पकडून त्यांची हत्या करत असत. यासाठी ते गोरक्षकाचा वेश धारण करत असत. त्यांचा प्रमुख उमर हाही गोरक्षक असल्याचे भासवून गायींची तस्करी करत असे. तो कपाळावर टिळा लावायचा आणि हातात त्रिशूळही ठेवायचा. त्याला कुणी विचारले, तर तो स्वतःला गोरक्षक म्हणून सांगायचा.
गोतस्करीत हिंदूंचाही सहभाग !
उत्तरप्रदेशातील केवळ मुझफ्फरनगर जिल्ह्यात गोहत्या कायद्यांतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांमध्ये हिंदूंच्या सहभागाची टक्केवारी सुमारे १५ आहे. यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत गोहत्या कायद्याचे एकूण २७ गुन्हे नोंदवण्यात आले यामध्ये ४ गुन्ह्यांमध्ये हिंदू आरोपी आहेत. या प्रकरणांतील हिंदू आरोपी गोमांसाची वाहतूक करणे, जिवंत गायी एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी वाहनात नेणे आणि गायींची खरेदी-विक्री करणे यांसारख्या गोष्टींमध्ये गुंतले होते.
धर्मशिक्षणाअभावी हिंदु गोतस्करीत गुंतत आहेत ! – निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी वेदमूर्तीनंद सरस्वती
निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी वेदमूर्तीनंद सरस्वती यांनी सांगितले की, सध्या हिंदु पालक त्यांच्या मुलांना आधुनिक बनवण्यासाठी संस्कारांपासून दूर नेत आहेत. ज्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलांना धर्म, गाय, गंगा, गीता इत्यादी गोष्टी कधीच शिकवल्या नाहीत, तीच मुले कालांतराने गोहत्येसारख्या पापात अडकत आहेत. गोहत्या आणि गोवंश तस्करींमध्ये गुंतलेल्या हिंदूंच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता वाटत असून प्रयागराजच्या महाकुंभमध्ये या विषयावर सर्व संतांसमवेत सखोल विचारमंथन केले जाईल आणि उपाय काढण्यात येईल.
काही हिंदूंना प्यादे बनवून संपूर्ण समाजाकडे बोट दाखवण्याचा कट रचणार्यांचे हेतू पूर्ण होणार नाहीत ! – आमदार टी. राजा सिंह
भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह याविषयी म्हणाले की, गोहत्येच्या मुळाशी मुसलमान समाजातील अतिरेकी आहेत; परंतु ते अत्यंत गरीब हिंदूंना आमिष दाखवतात आणि त्यांचा ढाल म्हणून वापर करतात. ज्यांना गायीचे महत्त्व ठाऊक नाही आणि ते अतिशय गरीब आहेत, तेच हिंदू गोतस्करी करत आहेत. गोतस्करीसाठी वापरण्यात येणार्या वाहनांचे चालक आणि क्लीनर (साहाय्यक) याच्यासमवेत तस्करीत वापरले जाणारे मजूरही हिंदू आहेत. मुसलमान पकडले गेल्यास आक्रमण टाळण्यासाठी हे हिंदू साहाय्यक ठरतात. कोणताही हिंदू गोहत्येला समर्थन देत नाही. गायीला माता मानतो आणि ती कापणार्याला धर्माचा शत्रू मानतो. काही हिंदूंना प्यादे बनवून संपूर्ण समाजाकडे बोट दाखवण्याचा कट रचणार्यांचा हेतू पूर्ण होणार नाही.
गोतस्करीसाठी अल्पवयीन हिंदु मुलांचा बुद्धीभेद !
एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, गोहत्या करणारे अल्पवयीन हिंदू मुलांचा बुद्धीभेद करत आहेत आणि त्यांना केवळ २०० ते ५०० रुपयांमध्ये गोहत्येसारखे गुन्हे करायला लावत आहेत. या अल्पवयीन मुलांना दिवसभर विविध भागांत फिरण्यासाठी प्रतिदिन २०० ते ३०० रुपये दिले जात होते. त्यांना कोणतीही असहाय्य गाय दिसली, तर लगेच झाडाला बांधून दूरभाषवर माहिती द्यावी, असे सांगण्यात आले आहे. गायींना बांधून ठेवल्यावर गोहत्या करणारे त्यांना त्यांच्या वाहनात कोंबून गोहत्येसाठी दूर कुठेतरी घेऊन जातात.
संपादकीय भूमिकाडावपेचांत हुशार असणारे धर्मांध मुसलमान ! गोतस्करांना आता फाशीचीच शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करून त्यांची कार्यवाही होऊ लागली, तर काही दिवसांतच गोतस्करी मुळासकट थांबेल ! |