Jhansi NIA Raid : झाशी (उत्तरप्रदेश) येथे मुफ्ती खालिद याची चौकशी करण्यास शेकडो धर्मांध मुसलमानांनी केला विरोध !

  • राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदच्या देशभरातील १९ ठिकाणांवर धाडी

  • मशिदीवरील भोंग्यावरून आवाहन करून मुसलमानांना केले गोळा !

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने जिहादी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदशी संबंधित प्रकरणांची चौकशी करतांना देशातील ५ राज्यांतील १९ ठिकाणी १२ डिसेंबर या दिवशी धाडी घातल्या. जम्मू-काश्मीर, आसाम, उत्तरप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र येथे या धाडी घालण्यात आल्या. यासाठी स्थानिक आतंकवादविरोधी पथकांचे साहाय्य घेण्यात आले. उत्तरप्रदेशातील झाशी येथे परदेशात धार्मिक शिक्षणासाठी ऑनलाईन शिकवणी वर्ग चालवणार्‍या मुफ्ती खालिद नदवी याच्या घरावर धाड घालण्यात आली. त्या वेळी स्थानिक मुसलमानांनी विशेषतः मुसलमान महिलांनी विरोध केला. खालिद यांना चौकशीसाठी नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.

१. झाशी कोतवाली परिसरात रहाणार्‍या खालिद याच्यासह मुकरायना येथील छोटी मशिदीमध्ये रहाणारा त्याचा नातेवाईक साबीर नदवी याच्या घरीही धाड घालून त्याची चौकशी करण्यात आली. सुमारे तासभर चाललेल्या चौकशीनंतर यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी त्याला पोलिसांच्या देखरेखीखाली सोडले आणि ते खालिदच्या ठिकाणी पोचले.

२. मुफ्ती खालिद याची चौकशी चालू असतांना स्थानिक मुसलमानांनी मशिदीतून घोषणा दिल्या. या घोषणेनंतर मुफ्ती खालिद याच्या घराबाहेर गर्दी जमली. मुसलमानांच्या जमावाने गोंधळ घातला. त्यांनी यंत्रणेच्या अधिकार्‍यांच्या कह्यात असलेल्या मुफ्ती खालिदचीही सुटका केली; मात्र अधिकार्‍यांनी पुन्हा मुफ्ती खालिदला कह्यात घेतले. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या अन्वेषण चालू आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतीय अन्वेषण यंत्रणांना चौकशी करण्यास विरोध करणार्‍या धर्मांध मुसलमानांवरच सरकारी कार्यात अडथळा आणल्यावरून कारवाई झाली पाहिजे !
  • मशिदींवरील भोंगे अजानसाठी (नमाजपठणासाठी बोलावण्यासाठी) नाही, तर त्याचा वापर देशविरोधी कारवाया करण्यासाठी मुसलमानांना गोळा करण्यासाठीही केला जातो, याचे हे आणखी एक उदाहरण होय ! काश्मीरमध्ये मशिदींवरील भोंग्यांवरून हिंदूंना त्यांच्या बायका आणि संपत्ती ठेवून परागंदा होण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. यांमुळेच हे भोंगे काढणेच आवश्यक आहेत !