Garland Gandhi wore on Dandi March : दांडी यात्रेत मोहनदास गांधी यांना घातलेल्या हाराला लंडनच्या लिलावात मिळाला नाही खरेदीदार !
लंडन (ब्रिटन) – वर्ष १९३० मध्ये मोहनदास गांधी यांनी मिठावरील कर रहित करण्यासाठी दांडी यात्रा काढली होती. या यात्रेत गांधी यांना हार अर्पण करण्यात आला. तो संग्रहात ठेवण्यात आला होता. अलीकडेच तो लंडनमध्ये लिलावासाठी ठेवण्यात आला होते; परंतु त्याला कुणीही खरेदीदार न मिळाल्याने त्याची विक्री होऊ शकली नाही. या हाराचे मूल्य २१ ते ३० लाख ठेवण्यात आले होते. याच लिलावात अनेक भारतीय कलाकृती होत्या, ज्या चांगल्या किमतीत विकल्या गेल्या. हा लिलाव ‘लियोन अँड टर्नबुल ऑक्शन हाऊस’ने आयोजित केला होता.
गांधी यांना घालण्यात आलेला हार गुलाबी कापड, पुठ्ठा, सोन्याचा धागा आणि कागद यांपासून बनवण्यात आला होता. यासमवेत गांधी यांना हार घालतांनाचे एक छायाचित्रही ठेवण्यात आले होते.
संपादकीय भूमिकायातून गांधी यांच्या विचारांची जादू आता उतरली आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! |