Andhra Pradesh : आंध्रप्रदेशमध्ये ‘नन’चे प्रशिक्षण घेणार्या ख्रिस्ती मुलीने कॉन्व्हेंटमध्ये बाळाला दिला जन्म !
|
अमरावती (आंध्रप्रदेश) – एलुरु येथील ‘सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हॉस्टेल’मध्ये ‘नन’चे प्रशिक्षण घेणार्या अल्पवयीन ख्रिस्ती मुलीने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिने या बाळाची हत्या केली. हे वसतीगृह एलुरुच्या ‘डायोसेसीन’ या चर्च-प्रशासित संस्थेच्या वतीने चालवले जाते. या प्रकरणी आंध्रप्रदेश पोलिसांनी एका प्रशिक्षणार्थी पाद्रीला कह्यात घेतले. त्या पाद्रीचे पीडित प्रशिक्षणार्थी ननसोबत संबंध होते.
Andhra Pradesh: A Christian girl training to become a ‘nun’ in Andhra Pradesh gives birth to a baby in a convent⚠️
The girl killed the newborn baby
A priest trainee who had an affair with the girl has been arrested 🧛
This is another example of how institutions run by the… pic.twitter.com/bRk8KtYIdm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 12, 2024
१. याविषयीच्या एका वृत्तानुसार ‘नन’ बनण्याचे प्रशिक्षण घेत असलेली ही ख्रिस्ती मुलगी आंध्रप्रदेशातील नंदयाल जिल्ह्यातील असून ती सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.
२. ८ डिसेंबर २०२४ या दिवशी तिने वसतीगृहात बाळाला जन्म दिला आणि लगेचच बाळाला खिडकीतून फेकून त्याची हत्या केली.
३. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महिला अन् बालकल्याण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले. पोलीस निरीक्षक रमणा यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अन्वेषण चालू केले.
४. या घटनेने कॉन्व्हेंट वसतीगृहाच्या प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.
संपादकीय भूमिका
|